case registered : तालुक्यातील निमगाव गुरु येथील शेतशिवारात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78, 351(2), 351(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी दिल्याचा आरोप; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरु येथील शेतशिवारात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78, 351(2), 351(3) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून ती सध्या निमगाव गुरु येथे वास्तव्यास आहे. संबंधित मुलगी शाळेत जात असताना आरोपी दशरथ सखाराम चित्ते हा तिचा कथितरीत्या चोरून पाठलाग करीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, ‘माझ्यासोबत चल, नाहीतर तुला उचलून घेऊन जाईन; नाहीतर मी फाशी घेतो,’ अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याशिवाय आरोपीने पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबत वाद घालून ‘मी कोणालाही घाबरत नाही,’ अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वी कुटुंबाची बदनामी होऊ नये, या कारणामुळे पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, आरोपीकडून पुन्हा त्रास वाढल्याने अखेर पीडित मुलीने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक 436/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
घटनेचे ठिकाण निमगाव गुरु येथील शेतशिवार असून 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1.31 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच PSO ब्रह्मा गिरी, API सविता कुवारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली. प्रकरणात ई-साक्षही नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर करीत असून पोलिसांकडून घटनेतील सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

