Mahabreaking

[breaking_news]

  Road caved : रस्ता खचला, पूल धोकादायक; नागरिकांनी स्वखर्चातून उभारले ‘सुरक्षा कवच’

Road caved :  शहरातील खचलेले रस्ते आणि असुरक्षित पूल नागरिकांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असताना प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुरुस्तीची प्रतीक्षा अखेर नागरिकांनीच संपवली. प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहत बसण्याऐवजी नागरिकांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत उभी करत धोकादायक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था उभारली. त्यामुळे ‘प्रशासन कुठे आणि नागरिक कुठे?’ असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Road

 बेलदारपुरा–औरंगपुरा मार्गावरील पुलाला नागरिकांचा आधार; कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत प्रशासनाला सवाल

झाकीर अहमद शेख

बाळापूर : शहरातील खचलेले रस्ते आणि असुरक्षित पूल नागरिकांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असताना प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुरुस्तीची प्रतीक्षा अखेर नागरिकांनीच संपवली. प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहत बसण्याऐवजी नागरिकांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत उभी करत धोकादायक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था उभारली. त्यामुळे ‘प्रशासन कुठे आणि नागरिक कुठे?’ असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बाळापूर नगरपरिषद कार्यालयासमोरून बेलदारपुरा–औरंगपुराकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याचा काही भाग दीर्घकाळापासून खचलेला आहे. पुलाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने पादचारी, विद्यार्थी तसेच दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यापूर्वी या परिसरात अपघात घडूनही कायमस्वरूपी सुरक्षाव्यवस्था करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

अपघात झाले, धोका कायम; अखेर नागरिकांनीच उचलला पुढाकार!

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले. मात्र, कायमस्वरूपी दुरुस्तीची कार्यवाही अपेक्षित वेगाने झाली नाही. अखेर ‘प्रशासनाची वाट पाहायची नाही, आता आपणच पुढाकार घ्यायचा,’ असा निर्धार करत नागरिकांनी आर्थिक मदतीसोबतच श्रमदानातून आवश्यक काम हाती घेतले.

२४ सप्टेंबरला बॅरिकेडिंग व रंगकाम पूर्ण

गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पुलाच्या धोकादायक बाजूस पाइप व अँगलच्या साहाय्याने बॅरिकेडिंग उभारण्याचे तसेच रंगकामाचे काम पूर्ण करण्यात आले. या जनहिताच्या उपक्रमासाठी मुजाहिद खान उर्फ मुज्जू सेठ, रईस सेठ, अब्दुल नईम, असलम मेंबर, हसनैन खान, अक्कू पहलवान, सय्यद फाजिल, राहुल, पिंटू पठाण, योगेश सिंह ठाकूर, ताबिश खान यांच्यासह इतर नागरिकांनी आर्थिक व श्रम सहकार्य केले. यावेळी सुलतान खान यांचीही उपस्थिती होती.

सुरक्षेची जबाबदारीही आता नागरिकांचीच का?

सार्वजनिक रस्ता आणि पूल सुरक्षित करण्यासाठी नागरिक स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पुढे येत असतील, तर कायमस्वरूपी दुरुस्तीची जबाबदारी असलेले प्रशासन नेमके कधी जागे होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनी उभारलेली ही सुरक्षाव्यवस्था तात्पुरता धोका कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरली असली, तरी रस्ता व पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता प्रशासन या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कधी करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top