Mahabreaking

[breaking_news]

Declare a drought :दुष्काळ जाहीर करा; अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करू” — नितीन देशमुखांचा सरकारला इशारा

Declare a drought : अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोणत्याही अटी-निकषांशिवाय कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत शिवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Declare a drought

 शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चातून सरकारवर हल्लाबोल; हेक्टरी ५० हजारांच्या मदतीसह दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अकोला : अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोणत्याही अटी-निकषांशिवाय कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत शिवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला.

Declare a drought

अकोला जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे शेतकरी आणि विविध संघटनांकडून सांगण्यात येत आहे. अलीकडेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अकोला दौऱ्यादरम्यानही शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

Declare a drought

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

आक्रोश मोर्चाला संबोधित करताना आमदार नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर टीका केली. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

“शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला मोर्चातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

दरम्यान, राज्य सरकारने पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याची प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश दिल्याचे अलीकडील वृत्तांतून समोर आले आहे.

सरकारवर टीकेची तोफ

मोर्चात सहभागी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरले. अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, बुलढाण्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड आणि जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात असल्याचे विविध वृत्तांतूनही समोर आले आहे. सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांकडून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे.

‘शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या’

शिवसेनेने सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करणे, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देणे, पीकविम्याशी संबंधित पूर्वीचे चार ट्रिगर पूर्ववत करून नुकसानभरपाई देणे, तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत देण्याचा समावेश आहे.

सिंचनाची सुविधा असलेल्या भागात कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी चोवीस तास कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली. नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच पुनर्गठित कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी पक्षाने केली.

याशिवाय जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा किंवा आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

स्वराज्य भवनातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आक्रोश मोर्चाला स्वराज्य भवनाच्या प्रांगणातून सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा शहीद मदनलाल धिंग्रा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह आणि पंचायत समितीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले. त्यामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला. मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना विविध मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले.

भगवे झेंडे, बैलगाड्या आणि सुकलेले सोयाबीन

मोर्चाच्या मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. बॅनरच्या माध्यमातून दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. काही प्रमुख नेते बैलगाड्यांवर सहभागी झाले होते. दिंडीच्या गजरात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सुकलेले सोयाबीन हातात घेऊन महिला व पुरुष शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले.

‘उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून सरकारवर टीका’

यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी उद्योगपतींच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले. मोठ्या उद्योगपतींच्या कर्जाबाबत सरकारकडून सवलती दिल्या जातात; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळी विविध अटी व निकष लावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पीककर्जाच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

दरम्यान, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने आगामी काळात शेतकरी प्रश्नावर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मोर्चात ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, माजी आमदार संजय गावंडे, संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, विदर्भ संपर्क संघटिका सागरताई पुरी, संपर्क संघटिका वैशाली घोरपडे, जिल्हा संघटिका प्रा. माया म्हैसने, डॉ. सरिता वाकोडे, प्रा. संतोष हुसे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, चंदू तिवारी, अतुल पवनीकर, संजय शेळके, भूषण भिरड, बबलू देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top