riot control drill: गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांची रंगीत तालीम; एसआरपीएफसह दंगा काबू पथकाचे संचलन
साखरखेर्डा : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
गणेश विसर्जन मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संताजी जगनाडे महाराज चौकातून निघणार आहे. गावातील आठही गणेश मंडळांचे गणपती याठिकाणी एकत्र येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक दगडी मस्जिद, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा आणि माळी पेठ मार्गे भोगावती नदीकडे जाईल. त्यानंतर नदीवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव व अन्य सण-उत्सवांच्या काळात गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शांतता भंग झाल्यास परिस्थितीवर पोलिस अधिकारी व कर्मचारी कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतात, याचे प्रात्यक्षिक साखरखेर्डा बसस्थानक परिसरात घेण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पथसंचलनात एसआरपीएफ पथक, दंगा काबू पथक, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते. यावेळी शांतता भंगाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावर पोलिसांकडून कशा प्रकारे नियंत्रण मिळविले जाते, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या प्रात्यक्षिकात माजी सैनिक तथा अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई यांच्या नेतृत्वाखाली सैनिक व पोलिस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थीही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मार्च करून प्रात्यक्षिकात सहभाग नोंदविला.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष पथके तयार ठेवली आहेत. नागरिकांनी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार युवराज रबडे यांनी केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

