Urdu Ghar: अकोला जिल्ह्यातील उर्दू भाषिक समाज, साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार आणि विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ‘उर्दू घर’च्या बांधकामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. मोहम्मद फरहान अमीन यांनी केली.

उर्दू भाषा-साहित्याच्या संवर्धनासाठी ‘उर्दू घर’चे काम तातडीने सुरू करण्याची मागणी
निशांत गवई
पातूर : अकोला जिल्ह्यातील उर्दू भाषिक समाज, साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार आणि विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ‘उर्दू घर’च्या बांधकामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. मोहम्मद फरहान अमीन यांनी केली.
यासंदर्भात प्रा. फरहान अमीन यांनी उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन साद केले. शासनाने ‘उर्दू घर’साठी प्रशासकीय मान्यता दिली असून, या प्रकल्पामुळे उर्दू भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
“शासनाने मान्यता दिलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात साकारला पाहिजे. या प्रकल्पाच्या बांधकामाला कोणताही विलंब न करता तातडीने सुरुवात करावी,” अशी ठाम मागणी प्रा. मोहम्मद फरहान अमीन यांनी केली.
‘उर्दू घर’च्या माध्यमातून उर्दू भाषिक समाजातील साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार आणि विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याने या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

