Mahabreaking

[breaking_news]

Horrific collision:  नागझरी-देऊळगाव माळी फाट्यावर ट्रक-दुचाकीची भीषण धडक;युवक ठार  

Horrific collision: नागझरीजवळील देऊळगाव माळी फाट्यावर सोमवारी सायंकाळी ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निशीन प्रकाश कापरे (वय २३) या होतकरू तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कापरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Horrific collision

  नागझरी फाट्यावर अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’; २३ वर्षीय होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत

साखरखेर्डा : नागझरीजवळील देऊळगाव माळी फाट्यावर सोमवारी सायंकाळी ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निशीन प्रकाश कापरे (वय २३) या होतकरू तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कापरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

accident

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव माळी येथील शेतकरी प्रकाश कापरे यांचा २३ वर्षीय मुलगा निशीन हा सोमवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त स्वतःच्या दुचाकीने मेहकरकडे निघाला होता. दरम्यान, नागझरी गावाजवळील देऊळगाव माळी फाट्यावर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 16 AY 8199 ने त्याच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, निशीनची दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात निशीन रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तेथे डॉ. अनिलकुमार गाभणे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार निशीनला छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

  गतिरोधकाची तातडीची गरज!

नागझरी-देऊळगाव माळी फाट्यावर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. हा फाटा अपघातांचा केंद्रबिंदू अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ बनत चालला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या धोकादायक फाट्यावर भारतीय रस्ते मानकांनुसार दोन्ही बाजूंनी योग्य ठिकाणी नियमबद्ध गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारण्यात यावेत. तसेच आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कापरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

निशीन हा शांत, समजूतदार आणि ध्येयवादी तरुण म्हणून परिचित होता. शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी तो मेहनत घेत होता. मात्र, नियतीने ऐन उमेदीच्या २३व्या वर्षीच त्याच्यावर काळाचा घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top