Mahabreaking

[breaking_news]

hourly-basis professors :तासिका प्राध्यापकांवरील अन्याय थांबवा;  ₹१,२०० ते ₹१,५०० प्रतितास मानधन द्या

hourly-basis professors : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये महाविद्यालयांतील प्रत्यक्ष अध्यापनाचा कार्यभार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मात्र केवळ ७ ते ८ साप्ताहिक अध्यापन तासांपुरते मर्यादित ठेवण्यात येत आहे. प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि दिले जाणारे अध्यापन तास यामध्ये मोठी विसंगती असून, हा प्रकार तासिका प्राध्यापकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने केला आहे.

chb

 १३ ते १५ तासांचा कार्यभार, मानधन मात्र तुटपुंजे;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आक्रमक

अमरावती :  शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये महाविद्यालयांतील प्रत्यक्ष अध्यापनाचा कार्यभार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मात्र केवळ ७ ते ८ साप्ताहिक अध्यापन तासांपुरते मर्यादित ठेवण्यात येत आहे. प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि दिले जाणारे अध्यापन तास यामध्ये मोठी विसंगती असून, हा प्रकार तासिका प्राध्यापकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने केला आहे.

महाविद्यालयांमध्ये अनेक ठिकाणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडे १३ ते १५ तासांपर्यंत प्रत्यक्ष अध्यापनाचा कार्यभार उपलब्ध आहे. असे असताना केवळ ७ ते ८ तासांचे अध्यापन देणे कोणत्याही परिस्थितीत योग्य व न्याय्य नाही. त्यामुळे शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून प्रत्येक पात्र तासिका तत्त्वावरील प्राध्यापकास किमान ९ साप्ताहिक अध्यापन तास देण्याचा स्पष्ट आदेश शासनाने निर्गमित करावा, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे.

तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, अध्यापनाची जबाबदारी, वाढता कार्यभार आणि सध्याची महागाई लक्षात घेता प्रति अध्यापन तास ₹१,२०० ते ₹१,५०० मानधन निश्चित करण्यात यावे,तसेच दरमहा मानधन देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

२०१७ ची संचमान्यता, २०२५-२६ च्या कार्यभारात विसंगती का?

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती आणि अध्यापनाचे तास निश्चित करताना २०१७ च्या संचमान्यतेचा आधार घेतला जातो, तर प्रत्यक्ष कार्यभार निश्चित करताना २०२५-२६ मधील उपलब्ध कार्यभाराचा आधार घेतला जात असल्याने दोन्हीमध्ये विसंगती निर्माण झाली आहे. एकाच प्रक्रियेसाठी वेगवेगळे निकष का वापरले जात आहेत, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सर्व महाविद्यालयांसाठी समान, पारदर्शक आणि न्याय्य निकष लागू करून प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभारानुसार तासिका प्राध्यापकांना अध्यापन तास देण्यात यावेत. केवळ कागदोपत्री निकषांचा आधार घेऊन प्राध्यापकांच्या रोजगाराच्या संधी आणि मानधनावर मर्यादा आणणे तातडीने थांबवावे, अशी भूमिका रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने घेतली आहे.

स्पष्ट आदेश काढण्याची मागणी

वरील सर्व मागण्यांचा तातडीने विचार करून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्पष्ट आणि सर्वसमावेशक आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस ॲड. आकाश गुलाबराव हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती डॉ. अजय खांबोरकर तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या प्रतिनिधी मंडळातील डॉ. रवींद्र तायडे, डॉ. धनंजय अमरावतीकर, प्रा. धम्मपाल गवई, प्रा. देवानंद जवंजाळ, अनुप तायडे यांच्यासह संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top