Mahabreaking

[breaking_news]

road blocked: शेतीचा जुना वहिवाटीचा रस्ता बंद; शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात एल्गार

road blocked: सागद येथील शेतीकडे जाणारा गावठाणातून जाणारा जुना वहिवाटीचा रस्ता काही व्यक्तींनी अडवून बंद केल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या कामाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यामुळे शेतात जाणे, शेतीची मशागत करणे तसेच शेतमालाची वाहतूक करणे अडचणीचे झाले असल्याचा आरोप करीत वृद्ध शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी बाळापूर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले.

road blocked

 ‘शेतात जायचे तरी कसे?’ रस्ता खुला करण्यासाठी सागदचे शेतकरी उपोषणावर

बाळापूर : सागद येथील शेतीकडे जाणारा गावठाणातून जाणारा जुना वहिवाटीचा रस्ता काही व्यक्तींनी अडवून बंद केल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या कामाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यामुळे शेतात जाणे, शेतीची मशागत करणे तसेच शेतमालाची वाहतूक करणे अडचणीचे झाले असल्याचा आरोप करीत वृद्ध शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी बाळापूर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदर रस्ता पूर्वीपासून वहिवाटीचा असून, त्याचा वापर करून ते नियमितपणे आपल्या शेतात ये-जा करीत होते. मात्र, काही काळापासून हा मार्ग बंद करण्यात आल्याने शेतीची कामे करण्यास तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवेदने देऊनही न्याय मिळाला नसल्याची खंत

रस्ता पूर्ववत मोकळा करून देण्याची मागणी घेऊन सागद ग्रामपंचायतीकडे सनदशीर मार्गाने निवेदने व मागणीपत्रे देण्यात आली. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी, बाळापूर तसेच तहसीलदार, बाळापूर यांच्याकडेही वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली. तरीही हा प्रश्न सुटला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

‘शेतात जायचे तरी कसे?’ शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

शेतीचा रस्ता हा शेतकऱ्यांसाठी केवळ ये-जा करण्याचा मार्ग नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, रस्त्याची वस्तुस्थिती तपासावी आणि शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

या आमरण उपोषणात सुधाकर विश्वनाथ तायडे, अनिल समाधान भारसाकळे, प्रकाश उद्धवराव दामोदर, संपत बालाराम भारसाकळे, एकनाथ नागोराव कराळे, भगवान तुकाराम उमरावते, गुलाबराव भिकाजी इंगळे, नागोराव रूपचंद गवारगुरु यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top