Mahabreaking

[breaking_news]

Rishi Panchami : ऋषिपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय वातावरणात सांगता

Rishi Panchami : स्थानिक लक्ष्मीनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज यांच्या ११६व्या पुण्यस्मरण दिनाचे व ऋषिपंचमीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

Rishi Panchami

 टाळ-मृदंगाच्या गजरात दुमदुमले लक्ष्मीनगर; संत गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रम

बोरगाव मंजू : स्थानिक लक्ष्मीनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज यांच्या ११६व्या पुण्यस्मरण दिनाचे व ऋषिपंचमीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

सकाळी श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची तीर्थस्थापना व अभिषेक करण्यात आला. मनीष तिवारी व योगिता तिवारी यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर होम-हवनाचा धार्मिक विधी पार पडला.

तद्नंतर ह.भ.प. रमेश महाराज दुधे यांच्या मधुर वाणीतून कालयाचे कीर्तन झाले. शेकडो भाविकांनी या कीर्तनाचा भक्तिभावाने श्रवण केला. दरम्यान, मृदंगाचार्य कृष्णा वसु यांच्या मृदंगवादन व गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी विठ्ठल आश्रमाचे ह.भ.प. सदानंद महाराज तसेच कृष्णा महाराज काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रींचे भक्त तथा महाप्रसाददाते मनीष तिवारी यांनी श्री चरणी महाप्रसाद अर्पण करून अन्नदान सेवा प्रदान केली. यावेळी सेवा समितीच्या वतीने मनीष तिवारी व योगिता तिवारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

दरम्यान, पंचक्रोशीतील भाविकांसह सेवाधारी मंडळ, ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक उत्सव यशस्वी करण्यासाठी संत गजानन महाराज सेवा समिती व सेवाधारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत सेवा अर्पण केली.

या धार्मिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरासह श्रींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top