Mahabreaking

[breaking_news]

Unidentified vehicle :अज्ञात वाहनाची दुचाकीला समोरासमोर धडक; युवक गंभीर जखमी

Unidentified vehicle :स्थानिक वाडेगाव पोलिस चौकीच्या हद्दीत इंदिरा नगर ते नकाशी मार्गावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली.

Unidentified vehicle

 नकाशी-वाडेगाव मार्गावर भीषण अपघात; ॲड. सुबोध डोंगरे मित्रमंडळींची तत्पर मदत

राहुल सोनोने

वाडेगाव : स्थानिक वाडेगाव पोलिस चौकीच्या हद्दीत इंदिरा नगर ते नकाशी मार्गावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील आकाश सीताराम अवचार हे नकाशी येथून वाडेगावकडे दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, नवीन पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आकाश अवचार गंभीर जखमी झाले. धडक एवढी जोरदार होती की, त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर जखमी आकाश रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते.

घटनेची माहिती मिळताच नकाशी येथील मंगेश भांगे तसेच वाडेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे ॲड. सुबोध डोंगरे, गौतम खंडारे, आकाश इंगळे, अशोक डोंगरे, अमोल डोंगरे आणि जय डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मित्रमंडळींनी तातडीने जखमी आकाश यांना उचलून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती असून, या वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top