commits suicide : येथील २४ वर्षीय युवकाने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकुलत्या एक मुलाच्या आत्महत्येने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर; विझोरा येथील घटना
विझोरा : येथील २४ वर्षीय युवकाने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत युवकाचे नाव रुतीक रतन चौधरी (वय २४) असे आहे. रुतीक हा अकोला येथील एमआयडीसी परिसरातील लेबन कंपनीत चारचाकी वाहनचालक म्हणून कार्यरत होता. १२ सप्टेंबर रोजी रात्री कामावरून घरी आल्यानंतर त्याने राहत्या घरातील एका खोलीत लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
१३ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
रुतीक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विझोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रुतीकने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आत्महत्येच्या कारणाचा शोध बार्शी टाकळी पोलीस घेत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

