Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja High School: GMRT पुणेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देऊळगाव राजा हायस्कूलची झेप; हर्षदा तिडके प्रथम

Deulgaon Raja High School: GMRT पुणे (Giant Metrewave Radio Telescope, Pune) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन–२०२६ मध्ये देऊळगाव राजा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने आयोजित या विज्ञान प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने प्रयोग सहभागी झाले होते. या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी कुमारी हर्षदा सुभाष तिडके हिने इयत्ता ८ ते १० गटात ‘Petrol Saver Cover’ या अभिनव प्रयोगासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे राष्ट्रीय स्तरावर देऊळगाव राजा हायस्कूलचे नाव उज्ज्वल झाले आहे.

Deulgaon Raja

 ७८४ प्रयोगांना मागे टाकत हर्षदा तिडके प्रथम; शौर्य तिडकेचीही उल्लेखनीय कामगिरी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : GMRT पुणे (Giant Metrewave Radio Telescope, Pune) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन–२०२६ मध्ये देऊळगाव राजा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने आयोजित या विज्ञान प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने प्रयोग सहभागी झाले होते. या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी कुमारी हर्षदा सुभाष तिडके हिने इयत्ता ८ ते १० गटात ‘Petrol Saver Cover’ या अभिनव प्रयोगासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे राष्ट्रीय स्तरावर देऊळगाव राजा हायस्कूलचे नाव उज्ज्वल झाले आहे.

इयत्ता ८ ते १० या गटात तब्बल ७८४ प्रयोग सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येतील प्रयोगांमधून प्रथम क्रमांक मिळविणे ही देऊळगाव राजा हायस्कूलसाठी अभिमानाची बाब आहे. हर्षदा तिडकेला विज्ञान शिक्षक श्री. संतोष बोरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, इयत्ता ५ ते ७ गटात शौर्य बाळकृष्ण तिडके याने ‘Magic Safety Stick for Farmers’ या नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे उल्लेखनीय यश संपादन केले. या गटात तब्बल ७२७ प्रयोग सहभागी झाले होते. शौर्यला श्रीमती पूनम सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. हर्षदा व शौर्य या दोन्ही विद्यार्थ्यांना श्री. सुभाष तिडके तसेच शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल ७ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर झाला असून विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

विज्ञान-नवोपक्रमाला शाळेचे प्रोत्साहन

देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, संशोधन, नवोपक्रम, कला, क्रीडा, पर्यावरण, सामाजिक उपक्रम तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारी प्रत्येक संधी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मानून शिक्षकवृंद तत्परतेने कार्यरत असतो. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या प्रयत्नांचे फलित म्हणून शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

शाळेचे प्राचार्य श्री. आर. बी. कोल्हे, उपप्राचार्य श्री. डी. व्ही. जाधव आणि पर्यवेक्षक श्री. पी. के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, जिज्ञासेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला योग्य दिशा मिळत आहे.

राष्ट्रीय स्तरावर मिळालेले हे यश म्हणजे विद्यार्थ्यांची प्रतिभा, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि शाळेच्या विद्यार्थी-केंद्रित कार्यसंस्कृतीचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे. हर्षदा तिडके आणि शौर्य तिडके यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच देऊळगाव राजा परिसरातून त्यांच्यावर आणि संपूर्ण शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे देऊळगाव राजा हायस्कूलच्या शिरपेचात राष्ट्रीय स्तरावरील आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top