Channi police raided : चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झरंडी परिसरात महिलांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे वृत्त ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले होते.चान्नी पोलिस प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत तातडीने कारवाई केली. वृत्त प्रकाशित झाल्याच दिवशी झरंडी परिसरातील दोन गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले.

झरंडीत दोन दारू अड्डे उद्ध्वस्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
राहुल सोनोने
वाडेगाव : चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झरंडी परिसरात महिलांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे वृत्त ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले होते.चान्नी पोलिस प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत तातडीने कारवाई केली. वृत्त प्रकाशित झाल्याच दिवशी झरंडी परिसरातील दोन गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले.
झरंडी येथील माजी सरपंच सुभाष राठोड, सामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव तसेच महिला व ग्रामस्थांच्या सहकार्याने बीट जमादार दिनेश झटाळे यांनी थेट झरंडी परिसर गाठला. यावेळी दोन ठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सावरगाव व पांगरताटी येथील प्रत्येकी एका व्यक्तीविरुद्ध, अशा दोघांविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी ठेवण्यात आलेला मोहाचा सडवा व साहित्य असलेले डबे फोडून नष्ट करण्यात आले.
दारूबंदीच्या लढ्यात महिला-ग्रामस्थांची एकजूट
झरंडी परिसरात अवैध दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांविरोधात महिला व ग्रामस्थांनी एकजूट दाखवून मोहीम सुरू केली आहे. विशेषतः महिला वर्गाने दारूबंदीच्या मागणीसाठी सक्रिय सहभाग घेतल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावातील अवैध दारूविक्रीमुळे कुटुंबांवर तसेच तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने होण्याची गरज असल्याचे महिला व ग्रामस्थांनी सांगितले.
दारूमुक्त गावासाठी महिला सज्ज
झरंडी गावातील तरुण पिढी आणि कुटुंबांवर होणारा दारूचा दुष्परिणाम रोखण्यासाठी आता महिला व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. गाव दारूमुक्त करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ सज्ज झाले असून, अवैध दारूविक्रीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
महिला व ग्रामस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

