Mahabreaking

[breaking_news]

three cattle :कत्तलीसाठी बांधलेल्या तीन गोवंशांना जीवदान; चान्नी पोलिसांची आलेगावात धडक कारवाई

three cattle : बाळापूर उपविभागांतर्गत चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आलेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने गोठ्यात उपाशीपोटी बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची चान्नी पोलिसांनी सुटका केली. पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जिवंत गोवंश ताब्यात घेतले.

three cattle

  उपाशीपोटी गोठ्यात बांधलेल्या तीन गोवंशांची सुटका; चान्नी पोलिसांनी ७० हजारांचे गोवंश घेतले ताब्यात

राहुल सोनोने

दिग्रस बू. : बाळापूर उपविभागांतर्गत चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आलेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने गोठ्यात उपाशीपोटी बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची चान्नी पोलिसांनी सुटका केली. पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जिवंत गोवंश ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव येथील एका गोठ्यात तीन गोवंश जातीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने उपाशीपोटी बांधून ठेवल्याची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार गजानन दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी नासिर खान यांच्या ताब्यातून अंदाजे ३ ते ४ वर्षे वयाच्या तीन जिवंत गोवंश गायी ताब्यात घेतल्या. या गोवंशांची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई चान्नी पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन दराडे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल यांनी पंचांच्या उपस्थितीत केली. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top