Pola festival : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाचा सार्वजनिक पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. बळीराजाच्या कष्टाचा आणि शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करणारा हा सण गावात उत्साहात पार पडला.

सर्जा-राजाच्या पूजनाने डोणगाव दुमदुमले; शेतकरी व बैलजोड्यांचा विशेष सत्कार
डोणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाचा सार्वजनिक पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. बळीराजाच्या कष्टाचा आणि शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करणारा हा सण गावात उत्साहात पार पडला.
या सोहळ्याची सुरुवात डोणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय आखाडे आणि सरपंच चरण आखाडे यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून करण्यात आली. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या आकर्षक पद्धतीने सजवून पोळ्याच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावेळी सरपंच चरण आखाडे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांचा तसेच त्यांनी सजवलेल्या बैलजोड्यांचा रुमाल व टोपी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘शेतकरी जगाचा पोशिंदा, बैल त्याचा खरा सोबती’
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरपंच चरण आखाडे म्हणाले, “शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून बैल हा त्याचा खरा सोबती आहे. पोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि बैलांच्या योगदानाचा आदर करण्याचा दिवस आहे.”
ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पोळ्याचा हा उपक्रम दरवर्षी याच उत्साहाने आणि एकत्रितपणे साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला गावातील तरुण मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या पोळा सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक शेषराव आखाडे, सुनील आखाडे, उपसरपंच श्याम आखाडे, ग्रामपंचायत सदस्य जुबेर खान, सुरेश फिसके यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

