Mahabreaking

[breaking_news]

vegetable vendor: डोणगावात भाजीविक्रेत्याची अनोखी ‘ऑफर’; पोषण आहारासाठी भाजीपाला घेणाऱ्या शिक्षकाला मोफत!

vegetable vendor:  येथील आठवडी बाजारात एका भाजीपाला विक्रेत्याने शाळांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्याची चर्चा आहे. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी भाजीपाला खरेदी करून नेणाऱ्या शिक्षकाला त्याच्या घरासाठी आवश्यक भाजीपाला मोफत देण्याची योजना संबंधित विक्रेत्याने सुरू केली आहे. या अनोख्या युक्तीची डोणगाव परिसरासह शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

vegetable vendor

  शिक्षकांसाठी भाजीपाला मोफत, पण गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; शिक्षण विभागाचे लक्ष वेधले

डोणगाव :  येथील आठवडी बाजारात एका भाजीपाला विक्रेत्याने शाळांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्याची चर्चा आहे. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी भाजीपाला खरेदी करून नेणाऱ्या शिक्षकाला त्याच्या घरासाठी आवश्यक भाजीपाला मोफत देण्याची योजना संबंधित विक्रेत्याने सुरू केली आहे. या अनोख्या युक्तीची डोणगाव परिसरासह शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शासनाच्या वतीने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत पोषण आहार दिला जातो. या आहारासाठी आवश्यक भाजीपाला खरेदी करण्याची जबाबदारी अनेक शाळांमध्ये शिक्षकांकडे असते. ही बाब लक्षात घेऊन डोणगावातील संबंधित भाजीविक्रेत्याने आपल्या दुकानातून शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला खरेदी करून नेणाऱ्या शिक्षकांकडून त्यांच्या घरच्या भाजीपाल्यासाठी कोणतेही पैसे न घेण्याची युक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे.

या ‘ऑफर’मुळे अनेक शाळांमधील शिक्षक त्याच विक्रेत्याकडून भाजीपाला खरेदी करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित दुकानात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत असून, विक्रेत्याच्या व्यापारी कल्पकतेची ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.

मोफत भाजीपाल्यामुळे प्रश्नचिन्ह

एका बाजूला व्यवसायाची प्रसिद्धी आणि दुसऱ्या बाजूला शाळांसाठी भाजीपाला विक्री वाढविण्याचा उद्देश, अशा दुहेरी हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, शाळांसाठी एकाच विशिष्ट दुकानातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी होत असल्याने या प्रकाराबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

मोफत मिळणाऱ्या घरच्या भाजीपाल्याच्या बदल्यात शाळांसाठी खरेदी होणाऱ्या भाजीपाल्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची गुणवत्ता, ताजेपणा व स्वच्छता यांची तपासणी होणे आवश्यक आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकाराची दखल घेऊन शाळांसाठी खरेदी होणाऱ्या भाजीपाल्याची गुणवत्ता तपासावी. तसेच एका विशिष्ट विक्रेत्याकडूनच भाजीपाला खरेदी करण्यामागील प्रक्रिया व नियमांचीही चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top