Namaz-e-Istisqa : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याच्या पार्श्वभूमीवर बारान-ए-रहमतसाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का व सामूहिक दुआचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव रोडवरील पिला नाला परिसरात असलेल्या मदरसा जामिया उलूमच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात येणार आहे.

पावसासाठी अल्लाहच्या दरबारी साकडे; मंगळवारी नमाज-ए-इस्तिस्का
बाळापूर : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याच्या पार्श्वभूमीवर बारान-ए-रहमतसाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का व सामूहिक दुआचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव रोडवरील पिला नाला परिसरात असलेल्या मदरसा जामिया उलूमच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात येणार आहे.
या विशेष आयोजनात बाळापूर शहरातील नागरिक, मान्यवर, उलेमा-ए-कराम, विविध मशिदींचे इमाम तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी सर्वांनी नम्रपणे तौबा-इस्तिगफार करून अल्लाह तआलाकडे बारान-ए-रहमतसाठी सामूहिक दुआ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या कमतरतेमुळे शेतकरी तसेच नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर रहमतच्या पावसासाठी अल्लाहच्या दरबारी प्रार्थना करण्यात येणार आहे.
हदीसचे अभ्यासक व मुफ्ती मो. असलम कासमी (बस्तावी) यांनीही नमाज-ए-इस्तिस्का अदा करून तौबा-इस्तिगफार व बारान-ए-रहमतसाठी दुआ करण्याचे आवाहन केले आहे.
या आध्यात्मिक उपक्रमात बाळापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पावसासाठी सामूहिक प्रार्थना करावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

