Two tipper trucks: जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरीत्या गौण खनिज अर्थात रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलगी फाटा परिसरात कारवाई करून रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. या कारवाईत दोन टिप्पर व सहा ब्रास रेती असा एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलगी फाट्यावर एलसीबीचा सापळा; दोन टिप्परसह सहा ब्रास रेती जप्त
बुलढाणा : जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरीत्या गौण खनिज अर्थात रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलगी फाटा परिसरात कारवाई करून रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. या कारवाईत दोन टिप्पर व सहा ब्रास रेती असा एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. ६ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलगी फाटा परिसरातून काही व्यक्ती टिप्परच्या माध्यमातून विनापरवाना रेतीची वाहतूक करीत आहेत. माहितीची खातरजमा करून पथकाने मलगी फाटा येथे मध्यरात्री सापळा रचून रस्त्यावर नाकाबंदी केली.
यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या दोन टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना रेतीची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत संबंधित दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत संदिप लिंबाजी देढे (वय २९, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) आणि पवन देविदास मुरकुट (वय २७, रा. डोरव्ही, ता. सिंदखेड राजा) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच-२८ बीबी-७५५६ (किंमत अंदाजे ३० लाख रुपये), टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच-१४ एमटी-४९३३ (किंमत अंदाजे ३० लाख रुपये) तसेच सहा ब्रास रेती (किंमत अंदाजे ३० हजार रुपये) असा एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम २१(१), २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुपकुमार मेहेर, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत इंगळे, सतीश नाटेकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड सहभागी झाले होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

