Teachers Day: क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

‘शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञान, संस्कारांचा सन्मान’; देऊळगाव राजात शिक्षक दिन उत्साहात
देऊळगाव राजा : क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरणभाऊ डोईफोडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये समितीच्या उपाध्यक्षा मनीषाताई सरपते, ज्येष्ठ पत्रकार व शिक्षण समिती तज्ज्ञ सुरजभाऊ गुप्ता, पत्रकार विलास जगताप, ॲड. भालचंद्रभाऊ डोईफोडे, ॲड. परमेश्वर शेळके, सुदर्शनभाऊ गीते, अमोलभाऊ जाधव, सचिव तथा मुख्याध्यापिका राजमाने मॅडम तसेच समिती सदस्य लताताई बोरकर, साधनाताई पवार, अनुराधाताई पवार यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम अत्यंत आपुलकीचा आणि प्रेरणादायी ठरला. बदलत्या काळात समाजाचा शिक्षकांकडे, विशेषतः सरकारी शाळा व सरकारी शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना जबाबदार, संवेदनशील आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे महान कार्य शिक्षक करतात,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मर्यादित साधनसामग्री उपलब्ध असतानाही सरकारी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि भावी पिढीच्या निर्मितीचा सन्मान असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
“ज्या समाजात शिक्षकांचा सन्मान होतो, त्या समाजाचे भविष्य उज्ज्वल होते,” या भावनेतून शाळा व्यवस्थापन समितीने राबविलेला हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणतज्ज्ञ सुरज गुप्ता यांनी केले, तर आभार प्रदर्शन गाडगे सर यांनी केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

