Mahabreaking

[breaking_news]

two goods vehicles :दोन मालवाहु वाहनांची धडक, मालवाहुचा चालक जागीच ठार

two goods vehicles : अमरावतीहून चिखली तालुक्यातील कवळा येथे जात असलेल्या पिकअप वाहनाला दुसऱ्या पिकअपने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पिकअप चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिवशक्ती धाब्यासमोर घडली. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी संबंधित पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

two goods vehicles

 राष्ट्रीय महामार्गावरील वाशिंबा बस थांब्या नजीकची घटना;  गुन्हा दाखल

बोरगाव मंजू : अमरावतीहून चिखली तालुक्यातील कवळा येथे जात असलेल्या पिकअप वाहनाला दुसऱ्या पिकअपने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पिकअप चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिवशक्ती धाब्यासमोर घडली. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी संबंधित पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर ज्ञानेश्वर जाधव (वय ४५, रा. कवळा, ता. चिखली) हे आपल्या वाहन चालक ज्ञानेश्वर प्रभाकर हागोने (वय ४०, रा. गौधनखेड, ता. चिखली) यांच्यासह पिकअप क्रमांक एमएच-२८ बीव्ही-५१८७ या वाहनाने अमरावतीहून कवळा येथे घरी परतत होते. पहाटेच्या सुमारास त्यांचे वाहन एनएच-५३ वरील शिवशक्ती धाब्यासमोर आले असता समोरून/दुसऱ्या दिशेने येणाऱ्या एमएच-२८ बीबी-०३०८ क्रमांकाच्या पिकअपच्या चालकाने वाहन कथित निष्काळजीपणे चालवून त्यांच्या पिकअपला धडक दिली.

या अपघातात पिकअप चालक ज्ञानेश्वर हागोने हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फिर्यादी सिद्धेश्वर जाधव यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात येऊन जबानी रिपोर्ट दिला.

या फिर्यादीवरून एमएच-२८ बीबी-०३०८ क्रमांकाच्या पिकअपचा चालक रंगनाथ भगवान रसाळ (रा. दहीगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १०६(१), १२५(बी) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही डे ऑफिसर एएसआय सतीश हाडोळे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top