Mahabreaking

[breaking_news]

Manoj Jaiswal:  पुनोती खुर्दचे केंद्रप्रमुख मनोज जयस्वाल शिक्षकांमध्ये निर्माण करीत आहेत प्रेरणेची ऊर्जा

Manoj Jaiswal: शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार मानले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पाया मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक सातत्याने करीत असतात. अशा शिक्षकांना विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देत प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द केंद्राचे दिव्यांग केंद्रप्रमुख मनोज जयस्वाल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

Manoj Jaiswal

   शिक्षकांना नवी ऊर्जा, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा; मनोज जयस्वाल यांचा प्रेरणादायी उपक्रम

बबन इंगळे

बार्शीटाकळी : शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार मानले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पाया मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक सातत्याने करीत असतात. अशा शिक्षकांना विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देत प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द केंद्राचे दिव्यांग केंद्रप्रमुख मनोज जयस्वाल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेला नियमित भेट देऊन जयस्वाल हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील शिक्षणाव्यतिरिक्त असलेल्या विविध कला व सुप्त गुणांचीही ते आवर्जून पारख करतात. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ते शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देत आहेत.

“विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या आयुष्याशी स्पर्धा न करता शिक्षणाशी स्पर्धा करावी. आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे चीज करून दाखवावे. उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करावी,” असा प्रेरणादायी संदेश केंद्रप्रमुख मनोज जयस्वाल विद्यार्थ्यांना देत असतात.

विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा व कर्तृत्वाचा आदर्श इतरांसमोर निर्माण करावा, यासाठीही ते सातत्याने मार्गदर्शन करतात. शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनोज जयस्वाल यांचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top