Mahabreaking

[breaking_news]

Water issue resolved:  पाणी प्रश्न सुटला, आंदोलन थांबले; जलजीवन मिशनच्या चौकशीवर आंदोलकांची नजर

Water issue resolved: मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे जुन्या पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतील कामांची चौकशी करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. प्रशासनाने गावातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केल्याने आंदोलकांनी हे पाऊल उचलले. मात्र, जलजीवन मिशनच्या कामाबाबत होणाऱ्या चौकशीत समाधान न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Water issue

  लोणी गवळीतील आंदोलनाला तात्पुरती स्थगिती; चौकशीत समाधान न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

डोणगाव : मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे जुन्या पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतील कामांची चौकशी करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. प्रशासनाने गावातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केल्याने आंदोलकांनी हे पाऊल उचलले. मात्र, जलजीवन मिशनच्या कामाबाबत होणाऱ्या चौकशीत समाधान न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.)चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील साहेबराव खंडारे, उपसरपंच संतोष भांबे पाटील, अंगद भालेराव, शरद चंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी गवळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि. २७ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गावातील महिला व नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, तसेच जलजीवन मिशन योजनेतील कामांची चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या होत्या.

आंदोलनाची दखल घेत मेहकर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप मेंटागळे यांनी दि. ४ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीमार्फत गावातील संपूर्ण गल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. यापुढेही पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचारी गजानन हरिभाऊ जाधव व अंबादास किसन जागृत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

संपूर्ण गावात पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या पत्राच्या आधारे आंदोलकांनी बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केले. पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागल्याने लोणी गवळी परिसरातील ग्रामस्थ व महिलांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, आंदोलक प्रशांत पाटील यांनी आंदोलनाला स्थगिती दिली असली तरी प्रशासनाला इशारा दिला आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी प्रस्तावित चौकशी समितीमार्फत जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करण्यात येणार असून, या चौकशीत समाधानकारक कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मेहकर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जलजीवन मिशनसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. संबंधित गावांमध्ये हा निधी योग्य प्रकारे खर्च झाला नाही किंवा कामे झाली नाहीत, तर मेहकर पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशाराही प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

त्यामुळे लोणी गवळीतील पाणीप्रश्नावर सध्या आंदोलनाला स्थगिती मिळाली असली, तरी जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी आणि त्यानंतर होणारी कार्यवाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top