Mahabreaking

[breaking_news]

eco-friendly Ganesh : पातुरात साकारणार एक हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; विद्यार्थ्यांचा अनोखा संकल्प

eco-friendly Ganesh : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा संकल्प केला आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला.

eco-friendly Ganesh

   किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनी जपला पर्यावरणाचा गणेशमंत्र!

निशांत गवई

पातूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा संकल्प केला आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला.

या कार्यशाळेत सुप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी शरद कोकाटे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट होते. पातूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, ‘झी २४ तास’चे जिल्हा प्रतिनिधी जयेश जगड, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे, गुल्हाने सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.

यानंतर कार्यशाळेचे मार्गदर्शक शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अत्यंत सोप्या व सहज पद्धतीने त्यांनी मूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतः गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. एक हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प हा पर्यावरण रक्षणासाठी त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरला आहे.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, नरेंद्र बोरकर, प्रियंका चव्हाण, बजरंग भुजबळराव, स्वप्निल पाटील, अविनाश पाटील, यश गवई, शुभांगी बोरकर, स्मितल उगले, वैशाली इंगळे, अक्षय तायडे, सदानंद कातखेडे, हरिष सौंदळे, तेजस्विनी गवई, समीक्षा डोंगे, मानसी दाते, धनश्री बोचरे, मरियम फातेमा, कल्पना वानेरे, केशनी नकाशे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top