Mahabreaking

[breaking_news]

Rajendra Rupanwar :डॉ. राजेंद्र रूपनवार आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Rajendra Rupanwar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवार यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो), सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा बुलढाणा यांनी केली आहे.

Rajendra Rupanwar
वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा : मॅग्मोचा तीव्र निषेध

गजानन तिडके 

बुलढाणा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवार यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो), सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा बुलढाणा यांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत मॅग्मो बुलढाणा संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले. डॉ. राजेंद्र रूपनवार हे फलटण उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सातारा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, डॉ. रूपनवार यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कोणताही विलंब न करता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी हे आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून त्यांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अनावश्यक ताणतणाव निर्माण होणार नाही, तसेच त्यांना सुरक्षित आणि ताणमुक्त वातावरणात काम करता येईल, यासाठी शासन व प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
भविष्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाच्या स्तरावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मॅग्मो बुलढाणा संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कणखर, कार्याध्यक्ष डॉ. महेंद्र सरपाते, सचिव डॉ. दत्ता मान्टे तसेच कोषाध्यक्ष डॉ. अमोल नाफडे यांच्या नेतृत्वाखाली मागणी करण्यात आली.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना ताणतणावमुक्त आणि सुरक्षित कार्यवातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा मॅग्मो बुलढाणा संघटनेने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top