Mahabreaking

[breaking_news]

Elderly man :पेट्रोल आणण्यासाठी महामार्ग ओलांडला अन् काळाने गाठले; झोटिंगा येथील वृद्धाचा मृत्यू

Elderly man : समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारी घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३१०, नागपूर कॉरिडॉर येथे दुपारी सुमारे २.१५ वाजता घडला.श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८, रा. झोटिंगा, ता. सिंदखेडराजा)  असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

man

समृद्धी महामार्ग ओलांडणे पडले महागात; अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारी घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३१०, नागपूर कॉरिडॉर येथे दुपारी सुमारे २.१५ वाजता घडला.श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८, रा. झोटिंगा, ता. सिंदखेडराजा)  असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पांग्रा येथून जवळ असलेल्या झोटिंगा येथील श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८, रा. झोटिंगा, ता. सिंदखेडराजा) हे आपल्या शेतात फवारणीचे काम करीत होते. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाचे पेट्रोल संपल्याने ते पेट्रोल आणण्यासाठी समृद्धी महामार्ग ओलांडून पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते.

दरम्यान, चॅनेल क्रमांक ३१० येथील नागपूर कॉरिडॉरवर रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत श्रीराम कुटे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे पुत्र मारुती श्रीराम कुटे यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली. अपघातानंतर घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घटनास्थळी एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन, पोलीस कर्मचारी इरफान शेख, आकाश यादव, राहुल कायंदे तसेच मलकापूर पोलीस केंद्रातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आवश्यक कार्यवाही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, लोणार येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top