Mahabreaking

[breaking_news]

  mosquito infestation: कचऱ्याचे ढीग, डासांचा प्रादुर्भाव; साथीच्या आजारांची वाढली धास्ती

mosquito infestation: पावसाचे प्रमाण कमी असतानाही शहरातील जुन्या भागासह विविध परिसरांत ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या डासांच्या संख्येमुळे संभाव्य साथीच्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

mosquito

स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; तातडीने फॉगिंगची नागरिकांची मागणी

बाळापूर : पावसाचे प्रमाण कमी असतानाही शहरातील जुन्या भागासह विविध परिसरांत ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या डासांच्या संख्येमुळे संभाव्य साथीच्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

शहरातील अनेक भागांत नियमित साफसफाई होत नसल्याने तसेच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः जुन्या शहरातील काही भागांमध्ये स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वेळीच उपाययोजना केली असती तर परिस्थिती गंभीर झाली नसती?

डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने वेळीच नियमित फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, नाल्यांची स्वच्छता आणि वेळेवर कचरा उचलण्यासारख्या प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक होते. प्रशासनाने आता तरी तातडीने उपाययोजना केल्यास संभाव्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

– ख्वाजा कामरान उर रहमान

 

कचरा उचलण्यासोबत नियमित फॉगिंगची मागणी

नगरपरिषद प्रशासन तसेच संबंधित कचरा ठेकेदाराने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याचे ढीग तातडीने हटवावेत, नाल्यांची स्वच्छता करावी तसेच डासांच्या नियंत्रणासाठी नियमित फॉगिंग आणि कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

– माजी नगरसेवक मुशीर उल हक

 

स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील भागांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास शहरात संभाव्य साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यास मोठी मदत होऊ शकते.

– अॅड. मोईन इमरान खान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top