Mahabreaking

[breaking_news]

Blood Donation: इबादत भी, जिंदगी भी ; युथ मूव्हमेंट नांदुराचे यशस्वी मेगा रक्तदान शिबिर

Blood Donation: ‘इबादत भी, जिंदगी भी’ या संदेशासह युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, युनिट नांदुरा यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. अल्लामा इक्बाल लायब्ररी, नांदुरा येथे मेगा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Blood

५२ युवकांनी केले रक्तदान; मानवसेवा, त्याग व समर्पणाचा संदेश

नांदुरा : ‘इबादत भी, जिंदगी भी’ या संदेशासह युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, युनिट नांदुरा यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. अल्लामा इक्बाल लायब्ररी, नांदुरा येथे मेगा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

१२ रबीउल अव्वल तथा हजरत मुहम्मद मुस्तफा यांच्या जन्मदिनानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ५२ युवकांनी रक्तदान करून मानवसेवा, त्याग आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

रक्तसंकलनासाठी शासकीय रुग्णालय, खामगाव तसेच लेडी हार्डिंग रुग्णालय, अकोला येथील दोन वैद्यकीय पथकांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकांनी रक्तसंकलनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

यावेळी खामगाव येथील वैद्यकीय पथकातील डॉ. प्रणाली देशमुख, सपना कांबळे, भारती काळे, राम आंभोरे आणि अनिल गाडवे यांचा उत्कृष्ट सेवा व सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या मेगा रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, युनिट नांदुरा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. नियोजनबद्ध आयोजन आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमाच्या माध्यमातून ‘रक्तदान ही एक अमूल्य मानवसेवा असून, गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण माध्यम ठरू शकते,’ असा समाजोपयोगी संदेश देण्यात आला.

युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे मेगा रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. रक्तदाते युवक, वैद्यकीय पथके, सत्कारमूर्ती, आयोजक आणि सर्व सहकाऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top