Mahabreaking

[breaking_news]

Horrific accident: टुनकी–लाडणापूर रस्त्यावर भीषण अपघात; चिमुकलीसह आईचा मृत्यू, दोघे गंभीर

Horrific accident: भरधाव कार आणि दुचाकीची धडक होऊन एका चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही  हृदयद्रावक घटना 28 ऑगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यातील टुनकी ते लाडणापूर रस्त्यावर घडली.  जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित चारचाकी वाहनाला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Horrific

 संतप्त जमावाने वाहन पेटविले ; संग्रामपूर तालुक्यात हृदयद्रावक दुर्घटना

संग्रामपूर : भरधाव कार आणि दुचाकीची धडक होऊन एका चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही  हृदयद्रावक घटना 28 ऑगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यातील टुनकी ते लाडणापूर रस्त्यावर घडली.  जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित चारचाकी वाहनाला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, चारचाकी वाहन टुनकीकडून लाडणापूरच्या दिशेने जात होते, तर दुचाकी लाडणापूरकडून टुनकीच्या दिशेने येत होती. यावेळी चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.अपघातात दुचाकीवरील एका चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सपना संजय वासकले (वय २६, रा. जसुंदी, मध्यप्रदेश) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात सनवीर संजय वासकले (वय ६, रा. जसुंदी, मध्यप्रदेश) तसेच कमलेश भुरलाल चंगळ (वय ३२, रा. मोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, वरवट बकाल येथे हलविण्यात आले. तेथून त्यांना शेगावमार्गे अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

अपघातात निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त जमावाने चारचाकी वाहनाला आग लावली. परिस्थिती चिघळू नये म्हणून सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आई आणि चिमुकलीचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. वृत्त लिहिपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. या प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top