Mahabreaking

[breaking_news]

Holy procession :ईद मिलादुन्नबी निमित्त बाळापुरात पवित्र जुलूस; धार्मिक कार्यक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण

Holy procession : पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र विलादतीच्या मुबारक प्रसंगी मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी बाळापूर येथील खानकाह नक्शबंदिया यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यामुळे शहरातील मुस्लिम समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Holy procession

  बाळापुरात ईद मिलादुन्नबीचा उत्साह; जियारत, जुलूससह विशेष महफिल-ए-मिलादचे आयोजन

बाळापूर : पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र विलादतीच्या मुबारक प्रसंगी मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी बाळापूर येथील खानकाह नक्शबंदिया यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यामुळे शहरातील मुस्लिम समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आल-ए-रसूल, गुलगुलजार नक्शबंदी सूफी राष्ट्र पीर-ए-तरीकत हजरत सय्यद शाह इजहारुल इस्लाम तालिब नक्शबंदी कादरी साहेब, निवासी खानकाह नक्शबंदिया, बाळापूर यांच्या सरपरस्तीखाली करण्यात आले आहे. तर आल-ए-रसूल, खतीब-ए-अहले सुन्नत, कायद-ए-बरार, पीर-ए-तरीकत हजरत सय्यद शाह जहीरुल इस्लाम जकी मियां नक्शबंदी कादरी साहेब, ट्रस्टी खानकाह नक्शबंदिया, बाळापूर यांच्या निगराणीखाली कार्यक्रम पार पडणार आहे.

दुपारपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

मंगळवारी नमाज-ए-जोहरनंतर महिलांसाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत, तर पुरुषांसाठी नमाज-ए-असरनंतर नमाज-ए-मगरिबपर्यंत पवित्र जियारत व जुलूस आयोजित करण्यात आला आहे. या वेळी भाविकांनी धार्मिक शिस्त, शांतता आणि सुव्यवस्था राखून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नमाज-ए-ईशानंतर विशेष महफिल-ए-मिलाद

नमाज-ए-ईशानंतर पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विलादतीच्या स्मरणार्थ विशेष महफिल-ए-मिलादचे आयोजन करण्यात आले आहे. या महफिलीत धार्मिक विद्वान व उलेमा पैगंबर-ए-इस्लाम यांच्या पवित्र सीरत, शिकवणी तसेच मानवतेसाठी दिलेल्या शांतता, प्रेम आणि बंधुभावाच्या संदेशावर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाला सय्यद शाह मंतबुल इस्लाम अदनान मियां नक्शबंदी कादरी मुजद्दिदी, मनोनीत सज्जादानशीन, खानकाह नक्शबंदिया यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

ईद मिलादुन्नबीच्या या पवित्र प्रसंगी बाळापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतता, धार्मिक सौहार्द, एकता आणि बंधुभावाचा संदेश अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top