Mahabreaking

[breaking_news]

Dhammachakra Pravartan Din: पातूरमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; ईगल ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक

Dhammachakra Pravartan Din: ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून पातूर शहरात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात निघालेल्या या ऐतिहासिक मिरवणुकीत ग्रामीण भागातून आलेले शेकडो भीमसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.

Dhammachakra

  जयभीमच्या जयघोषाने पातूर दुमदुमले! ईगल ग्रुपच्या मिरवणुकीत शेकडो भीमसैनिक सहभागी

राहुल सोनोने  

 दिग्रस बु. : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून पातूर शहरात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात निघालेल्या या ऐतिहासिक मिरवणुकीत ग्रामीण भागातून आलेले शेकडो भीमसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.

ईगल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सागर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पुढे नेण्यात आली. पातूर येथील नानासाहेब नगरातून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मिरवणुकीदरम्यान निनादणाऱ्या संगीताच्या तालावर संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता. उत्साह, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी ईगल ग्रुपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य लाभले. सर्वांच्या सहभागामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव उत्साहात संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top