Old Man Consumes Poison : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील स्थानिक पोलिस चौकीसमोरच ६५ वर्षीय इसमाने विषप्राशन केल्याची घटना बुधवारी (दि. १३ मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील स्थानिक पोलिस चौकीसमोरच ६५ वर्षीय इसमाने विषप्राशन केल्याची घटना बुधवारी (दि. १३ मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पातूर तालुक्यातील आगीखेड येथील देवगन राघोजी अवचार (वय ६५) यांनी वाडेगाव येथील पोलिस चौकीसमोर विषप्राशन केले. घटनेच्या वेळी पोलिस चौकीत कोणतेही कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित इसमासोबत त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला येथे रुग्णवाहिकेद्वारे हलविले.दरम्यान, हा प्रकार घरगुती वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पुढील तपास सुरू आहे.

