married woman: मेहकर तालुक्यातील डोणगाव विठ्ठलवाडी येथून २८ वर्षीय विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडीतील विवाहित महिलेला पळवून नेल्याची तक्रार; २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव विठ्ठलवाडी येथून २८ वर्षीय विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय व्यक्तीच्या 28 वर्षीय पत्नीला नितीन जनार्धन डुकरे (वय २४, रा. विठ्ठलवाडी) याने २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी ज्ञानेश्वर राठोड यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलीस ठाण्यात आरोपी नितीन डुकरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये कायमी अप क्रमांक ३१६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा २६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.४९ वाजता दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गावढे यांनी फिर्याद नोंदवून घेतली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर सोनुने करीत आहेत. महिलेचा शोध घेण्यासह घटनेमागील नेमके कारण काय आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

