Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

minor girl raped :१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भधारणा उघड झाल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

minor girl raped : तालुक्यातील एका गावात १२ वर्षे ४ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

minor girl raped

चिखली : तालुक्यातील एका गावात १२ वर्षे ४ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर शेषराव सुरडकर (वय २२, रा. डोंगर खंडाळा, ता. चिखली) याच्याविरुद्ध  भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(f), 64(2)(h), 64(2)(i), 64(2)(m), 65(2) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 मधील कलम 6, 10 व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १५ जून २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आरोपीने पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे पुढे स्पष्ट झाले.तक्रारीनुसार, १५ जून २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे पुढे स्पष्ट झाले. दरम्यान, पीडितेला पोटदुखीची तक्रार जाणवल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय तपासणीत गर्भधारणा झाल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा नोंदविण्यास झालेला विलंब हा गर्भधारणा उघड झाल्यानंतरच प्रकार समोर आल्यामुळे झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे करीत असून संबंधिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top