Mahabreaking

[breaking_news]

Anganwadi workers :उत्कृष्ट सेवेसाठी ११ अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सत्कार

Anganwadi workers : भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने बीबी येथे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार करण्यात आला.

Anganwadi

बीबी येथे अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; भाजपच्या वतीने सेवा कार्याचा गौरव

रमेश खंडागळे

 बीबी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने बीबी येथे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार करण्यात आला.

५ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात परिसरातील ११ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांचे संगोपन, पोषण, आरोग्य आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सेविका व मदतनीसांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पक्षाचे परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोपाल काबरा यांनी परिश्रम घेतले. तसेच किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, युवा मोर्चाचे राम पाटील डुकरे व प्रवीण धाईत, कामगार आघाडीचे जिल्हा सचिव दीपक लोहारे, गजानन पंदे, अमोल गावडे, भागवत मुळे, कार्तिक धाईत आणि किसन रणमळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top