Mahabreaking

[breaking_news]

Sabudana Khichdi distributed :आषाढी एकादशीनिमित्त बाळापूरात दीड क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप; हजारो भाविकांनी घेतला लाभ

Sabudana Khichdi distributed : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाळापूर येथील बसस्थानक आणि विठ्ठल मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांच्या पुढाकाराने दीड क्विंटल (१५० किलो) साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो वारकरी व प्रवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला.

Sabudana Khichdi distributed

  राष्ट्रवादीचे संदीप पाटील यांचा सेवाभावी उपक्रम; बसस्थानक व विठ्ठल मंदिरात खिचडी प्रसादाचे वितरण

बाळापूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बाळापूर येथील बसस्थानक आणि विठ्ठल मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांच्या पुढाकाराने दीड क्विंटल (१५० किलो) साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो वारकरी व प्रवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभर विठ्ठलभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी बाळापूर बसस्थानकावर होती. याच पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांसाठी पौष्टिक व उपवासासाठी योग्य अशा साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

संदीप पाटील यांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून आषाढी एकादशीच्या दिवशी हा सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावर्षीही बसस्थानकासह विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना प्रेमाने खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेक वारकरी, प्रवासी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.

यावेळी संदीप पाटील यांनी धार्मिक सण हे केवळ उत्सव नसून समाजसेवेची संधी असल्याचे सांगितले. भाविकांची सेवा करण्याची परंपरा पुढील काळातही कायम ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी खिचडी तयार करणे, पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली. शिस्तबद्ध नियोजनामुळे हजारो भाविकांना कोणतीही गैरसोय न होता प्रसादाचे वितरण करण्यात आले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे धार्मिक वातावरणात सेवाभावाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top