Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Youth murdered : अकाेल्यात युवकाची हत्या करून प्रेत जाळले, चार आराेपी गजाआड 

Youth murdered : बेपत्ता झालेल्या अकाेल्यातील  युवकाची हत्या झाल्याचे पाेलीस तपासात समाेर  आले असून पाेलिसांनी  चार जणांना गजाआड केले. जुन्या वादातून आठ जणांनी या युवकाला एका  हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी बाेलावले  व नंतर त्यांची हत्या केल्याचे समाेर आले आहे. अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, बाळापूर रोड, जुने शहर, अकोला) असे मृतक युवकाचे नाव आहे.

Youth murdered

आठ जणांनी केली हत्या : बेपत्ता युवकाची हत्या झाल्याचे आले समाेर
अकोला : बेपत्ता झालेल्या अकाेल्यातील  युवकाची हत्या झाल्याचे पाेलीस तपासात समाेर  आले असून पाेलिसांनी  चार जणांना गजाआड केले. जुन्या वादातून आठ जणांनी या युवकाला एका  हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी बाेलावले  व नंतर त्यांची हत्या केल्याचे समाेर आले आहे. अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, बाळापूर रोड, जुने शहर, अकोला) असे मृतक युवकाचे नाव आहे.
दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात शिला विनायक नागलकर यांनी फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर हा २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी घरून बाहेर गेला, परंतु तो परत आला नाही. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे मिसिंग क्रमांक ४४/२०२५ नोंदविण्यात आली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना तपासासाठी आठ पथके गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेची चार, डाबकी रोड पोलीस ठाण्याची दोन व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या दोन — अशा आठ पथकांनी जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर शोधमोहीम राबविली.
या पथकांनी सतत ४८ तास अथक प्रयत्न करत गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिली की, त्याच्यासह ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, किष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे यांनी जुन्या वादातून अक्षय नागलकर यास भौरद येथील “एमएच ३०” हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलावून घेतले आणि त्याचा खून करून त्याचे शव मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनाच्या शेडमध्ये जाळले.
यानंतर पोलिसांनी चंद्रकांत बोरकर, अशोक उर्फ ब्रम्हा भाकरे, किष्णा भाकरे आणि आशु उर्फ आशिष वानखडे यांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई  पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्‌डी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन पाटील, प्रभारी अधिकारी अभिषेक अंधारे (पो. स्टे. डाबकी रोड), सपोनि गोपाल ढोले, पो. उपनिरीक्षक गोपाल जाधव, अनिल चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखा तसेच डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरित्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top