Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Youth killed: धुपेश्वरमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्या, एक गंभीर 

Youth killed: दुचाकीला कट मारल्याने झालेल्या किरकोळ वादातून ९ जणांच्या टोळीने दोन युवकांवर चाकूने हल्ला केला.यामध्ये एक युवक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला.ही घटना ८ ऑक्टोबर रोजी धुपेश्वर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पाच जण फरार आहेत.
Dhupeshwar, a
मलकापूरातील धुपेश्वर येथील घटना, चार आरोपी अटकेत
मलकापूर : दुचाकीला कट मारल्याने झालेल्या किरकोळ वादातून ९ जणांच्या टोळीने दोन युवकांवर चाकूने हल्ला केला.यामध्ये एक युवक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला.ही घटना ८ ऑक्टोबर रोजी धुपेश्वर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पाच जण फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र धुपेश्वर (ता. मलकापूर) येथे मोटारसायकलला “कट” लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. वाद चिघळत जाऊन अविनाश झाल्टे (वय २१) या युवकावर टोळीतील सदस्यांनी चाकूने हल्ला केला, तर त्याला वाचविण्यास आलेल्या सतीश गजानन झाल्टे (वय २३) यालाही चाकूने भोसकण्यात आले.
गंभीर जखमी सतीशला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अविनाश झाल्टे हा सध्या जळगाव येथे उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी फिर्यादी सुधीर सुनिल झाल्टे (रा. चित्राळा, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली.अटक केलेल्या आरोपींमध्ये साहिल सुधाकर पालवे (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर), देवसिंग तिलकसिंग ठाकूर (रा. रामवाडी, मलकापूर) संकेत सुनिल उन्हाळे (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर),
अरविंद उर्फ गवऱ्या अजय सोळंखे (रा. लक्ष्मी नगर, मलकापूर)यांचा समावेश आहे.
तर घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींमध्ये आदित्य वानखेडे, ऋषी इंगळे, हर्षल घोंगटे, गणेश वायडे आणि कौशल्य घाटे यांचा समावेश आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये  गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत, अशी माहिती ठाणेदार हेमराज कोळी यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top