Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Youth Dies :देऊळगावमहीत विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू; नळाचे पाणी भरताना घडली घटना 

Youth Dies : नळाचे पाणी भरत असताना एकाचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील देऊळगावमही येथे सोमवारी (दि. ३० मार्च) सायंकाळी घडली. गणेश आश्रुबा बनसोडे (वय ४०, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

Youth Dies

देऊळगाव राजा : नळाचे पाणी भरत असताना एकाचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील देऊळगावमही येथे सोमवारी (दि. ३० मार्च) सायंकाळी घडली. गणेश आश्रुबा बनसोडे (वय ४०, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ते घराजवळील नळाची मोटार सुरू करत होते. यावेळी अचानक विजेचा करंट लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तत्काळ मदतीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी मृताचे भाऊ विष्णू आश्रुबा बनसोडे (वय ४६, व्यवसाय चहा हॉटेल, रा. देऊळगावमही) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कायम मर्ग क्रमांक ०९/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई यांनी रात्री ९.५६ वाजता केली. प्राथमिक अहवाल आणि अकस्मात मृत्यू क्रमांक ५१/२०२६ नुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे देऊळगावमही परिसरात शोककळा पसरली असून बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top