Mahabreaking

[breaking_news]

Young Man Subjected :जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; कटरने छातीत वार केल्याचा आरोप, चौघांवर गुन्हा

Young Man Subjected : जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर कथितरीत्या धारदार कटरसदृश हत्याराने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना देऊळगावमही येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Young Man Subjected

देऊळगाव राजा : जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर कथितरीत्या धारदार कटरसदृश हत्याराने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना देऊळगावमही येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्षेयश उर्फ दीप सुरेश पडघान (वय २४, रा. देऊळगावमही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गावात जुने भांडण उकरून काढत आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. “तुला अटक का झाली नाही?” असा जाब विचारत आरोपींनी कथितरीत्या शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी रतन कोठारी यांनी फिर्यादीचा हात पकडला, तर आकाश कोठारी यांनी जवळील कटरसदृश धारदार वस्तूने छातीवर वार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर इतर आरोपींनी चापटाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आकाश रतन कोठारी, सुभाष रतन कोठारी, रतन कपूरचंद कोठारी व रंजना रतन कोठारी (सर्व रा. देऊळगावमही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने देऊळगावमही दूरक्षेत्र येथे दिलेल्या अहवालावरून पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक २३४/२०२६ नोंदविण्यात आला असून प्राथमिक तपासानंतर प्रकरण बिट पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top