Young man ends his life: बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील विनोद गोपीनाथ कारंजकर (वय ४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.

मासरूळला युवकाच्या आत्महत्येने खळबळ; धाड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
पंडीत सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील विनोद गोपीनाथ कारंजकर (वय ४६) यांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.
धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मासरूळ येथे विनोद कारंजकर हे आपल्या कुटुंबासह राहत होते. १८ ऑगस्ट रोजी दुपारनंतर त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी मृतकाचा भाऊ राजू गोपीनाथ कारंजकर यांनी धाड पोलिसांत फिर्याद दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह धाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री दहा वाजता मासरूळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल भगवान खमाटे करीत आहेत.
मृतक विनोद कारंजकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ आणि एक बहीण असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

