Mahabreaking

[breaking_news]

transformer is getting a blast of cool air :काय सांगता, रोहीत्रालाही कुलरची हवा, वाढत्या तापमान वाढीवर महावितरणचा जुगाड

transformer is getting a blast of cool air :विदर्भासह अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. मूर्तिजापूर शहरात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांच्या घरात पोहोचल्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता विजेची यंत्रणाही या उष्णतेसमोर ‘घामाघूम’ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात एका विद्युत डीपीला चक्क कुलर लावून थंड ठेवण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच चर्चेलाही उधाण आले आहे.

transformer is getting a blast of cool air

  उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी मूर्तिजापुरात लावले कूलर

संजय उमक

मूर्तिजापूर : विदर्भासह अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. मूर्तिजापूर शहरात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांच्या घरात पोहोचल्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता विजेची यंत्रणाही या उष्णतेसमोर ‘घामाघूम’ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात एका विद्युत डीपीला चक्क कुलर लावून थंड ठेवण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच चर्चेलाही उधाण आले आहे.

वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल प्रचंड गरम होऊन डीपी ट्रिप होणे किंवा जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी स्थानिक तंत्रज्ञांनी ‘जुगाड’ करत डीपीसमोर मोठा कुलर लावून थंड हवा देण्याची व्यवस्था केली आहे. कडक उन्हात ही डीपी थंड राहावी आणि नागरिकांना अखंड वीजपुरवठा मिळावा, हा या प्रयोगामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. या अनोख्या दृश्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन हा ‘कूल’ प्रयोग पाहण्यास गर्दी केली. रस्त्याने जाणारा प्रत्येकजण क्षणभर थांबून डीपीसमोर लावलेला कुलर पाहत होता. काहींनी यावर मिश्किल प्रतिक्रिया देत “माणसाला एसी परवडत नाही, पण डीपी मात्र कुलरच्या थंडीत आहे,” अशी टिप्पणी केली, तर काहींनी या कल्पकतेचे कौतुकही केले.

दरम्यान, अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न जरी आगळावेगळा वाटत असला, तरी तो उष्णतेची तीव्रता अधोरेखित करणारा ठरत आहे. डीपी गरम होऊन वीज गेल्यास नागरिकांचा पारा चढू नये, म्हणूनच कदाचित डीपीचा पारा ‘शांत’ ठेवण्याचा हा प्रयत्न असावा. मूर्तिजापूरच्या या ‘थंड’ कल्पनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली असून, विदर्भाच्या उन्हात आता यंत्रणेलाही ‘कूल’ राहण्यासाठी कूलरची गरज भासू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top