Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Women voters firmly refused :महिला मतदारांचा ठाम नकार : साड्यांच्या आमिषाला बळी न पडता रस्त्यावरच साड्या पेटवल्या

Women voters firmly refused :महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातील उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अज्ञात उमेदवाराकडून साडी वाटप करण्यात आले, मात्र महिलांनी हा प्रकार सपशेल फेटाळत साड्या रस्त्यावरच पेटवून आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे निवडणूक काळातील अनैतिक प्रचारपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Women voters firmly refused

अकोला महानगर पालिका निवडणुकीतील प्रकार

अकोला : महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातील उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मतदारांना आमिष दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अज्ञात उमेदवाराकडून साडी वाटप करण्यात आले, मात्र महिलांनी हा प्रकार सपशेल फेटाळत साड्या रस्त्यावरच पेटवून आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे निवडणूक काळातील अनैतिक प्रचारपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उमेदवारांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, ताथोड नगर परिसरात रात्रीच्या सुमारास प्रत्येक घराच्या दरवाज्यासमोर साडी ठेवून जाण्याचा प्रकार समोर आला. सकाळी घराबाहेर पडताच महिलांना दरवाज्यासमोर साड्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

एक-दोन घरांपुरता हा प्रकार मर्यादित नसून, परिसरातील बहुतांश महिलांच्या घरासमोर साड्या ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महिलांनी एकत्र येत या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. मत विकत घेण्याच्या प्रयत्नाला ठाम नकार देत महिलांनी अज्ञात उमेदवाराकडून दिलेल्या साड्या रस्त्यावरच पेटवून संताप व्यक्त केला.

या प्रकारामागे नेमका कोण उमेदवार आहे, याचा उलगडा अद्याप झाला नसला तरी, निवडणूक आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

आमचे मत विकासाला!

निकृष्ट दर्जाच्या साड्या देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न केल्याने महिला मतदारांचा संताप अधिकच वाढला. “आमचे मत कोणत्याही आमिषाला नाही, तर विकासाला जाणार आहे,” असा ठाम निर्धार व्यक्त करत महिलांनी लोकशाही मूल्यांचे दर्शन घडवले. हा प्रकार म्हणजे मतदारांची वाढती राजकीय जागरूकता आणि अनैतिक प्रचाराविरोधातील स्पष्ट भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top