Mahabreaking

[breaking_news]

Navdurga immersion : नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांचा जल्लोष! टिपरी अन् गरब्याच्या तालावर साखरखेर्डा थिरकले

Navdurga immersion : साखरखेर्डा येथे नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टिपरी नृत्य, गरबा आणि पावलीच्या तालावर महिलांनी व युवतींनी ठेका धरल्याने मिरवणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली. सार्वजनिक स्वरूपात सहा, तर इतर ठिकाणी १२ देवींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत देवीला निरोप देण्यात आला.

Navdurga

 नवदुर्गा विसर्जनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; अनुसया माता मंडळाच्या नृत्याने जिंकली प्रेक्षकांची मने

साखरखेर्डा   : साखरखेर्डा येथे नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टिपरी नृत्य, गरबा आणि पावलीच्या तालावर महिलांनी व युवतींनी ठेका धरल्याने मिरवणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली. सार्वजनिक स्वरूपात सहा, तर इतर ठिकाणी १२ देवींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत देवीला निरोप देण्यात आला.

Navdurga

नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच प्रारंभ झाला. काही मंडळांनी खंडोबाच्या माळावरील तलावात, तर काहींनी महालक्ष्मी आणि गायखेडी तलावात देवीचे विसर्जन केले. दुपारी एक वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या ठिकाणी प्रशस्त मोकळे पटांगण असल्याने विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी उत्साहात नृत्याचा आनंद घेतला.

Navdurga

त्यानंतर ही मिरवणूक मेन रोड, अग्रसेन चौक, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा आणि महात्मा ज्योतिबा नगरमार्गे भोगावती नदीवर पोहोचली. मिरवणुकीत परदेशी नवदुर्गा माता मंडळ, अनुसया माता नवदुर्गा उत्सव मंडळ, महात्मा फुले नवदुर्गा मंडळ, जगदंबा माता उत्सव मंडळ, अहिल्याबाई होळकर नवदुर्गा मंडळ आणि वीर लहुजी वस्ताद नवदुर्गा मंडळ यांचा सहभाग होता.

प्रत्येक मंडळात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. टिपरी नृत्य आणि गरब्याच्या तालावर महिलांनी व युवतींनी मनसोक्त नृत्य केले. विशेषतः अनुसया माता मंडळातील महिला आणि युवतींनी आपल्या नृत्यकौशल्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आणि पावली खेळत मिरवणूक पुढे सरकत होती. सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत भोगावती नदी परिसरात विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू होती. त्यानंतर विविध मंडळांनी आपापल्या पद्धतीने देवीचे विसर्जन केले.

दरम्यान, महालक्ष्मी तलाव परिसरात एकता नवदुर्गा मंडळासह आठ मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणुका काढल्या. विशेष म्हणजे, पोलीस बंदोबस्त नसतानाही सायंकाळी सहा वाजता विसर्जनाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

या मिरवणुकीत माजी सरपंच महेंद्र पाटील, अमित जाधव, माजी सरपंच सुनील जगताप, संतोष मंडळकर, गोपाल पाझडे, संदीप मगर, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, संतोष दसरे, महसूल मंडळाधिकारी प्रशांत पोंधे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य सहभागी झाले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मदने यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक नृत्यांचा आविष्कार आणि शांततेत पार पडलेल्या विसर्जनामुळे साखरखेर्ड्यातील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण ठरली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top