Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 Chief Minister Devendra Fadnavis :पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची परंपरा जशी आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Chief Minister Devendra Fadnavis
‘महा पशुधन एक्स्पो 2026’ला मुख्यमंत्र्यांची भेट; ‘ग्रामीण पशुधन उद्योजक’ योजनेची घोषणा

परळी वैजनाथ : “आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची परंपरा जशी आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अंबेजोगाई रस्ता लगतच्या ओपळे मैदानावर आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पशुपालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवामान जोखमीवर मात करण्यासाठी पशुधन महत्त्वाचे

मुख्यमंत्री म्हणाले की, हे प्रदर्शन केवळ सोहळा नसून कोरडवाहू शेतीतील ‘क्लायमेट रिस्क’ कमी करण्यासाठीचे धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाल्यास पशुधन शेतकऱ्याचा आधार ठरते. गाईचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन तिला ‘राज्यमाता’ दर्जा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

AI, एम्ब्रियो ट्रान्सप्लांटमुळे दुग्धोत्पादन वाढणार

दुग्ध उत्पादनातील तफावत कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भ-मराठवाड्यात मदर्स डेअरी सोबत करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्र सुरक्षित असल्याचे सांगत, भारत-अमेरिका करारामुळे सोयाबीन किंवा कापूस आयातीचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय शेतकऱ्यांसाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गावातील तरुण होईल ‘पशुधन उद्योजक’

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, लवकरच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू होणार असून महिलांना शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जवाटप, पुरस्कार आणि सामंजस्य करार

कार्यक्रमात महिला बचत गटांना कर्जवाटप, ‘राष्ट्रीय गोपाल रत्न-2025’ विजेत्यांचा सत्कार तसेच विविध पशुधन प्रकल्पांशी संबंधित सामंजस्य करारांचे प्रतिकात्मक हस्तांतरण करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती दालनाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

उदगीर दूध भुकटी प्रकल्प ₹100 कोटी खर्चून पुन्हा सुरू

नैसर्गिक शेतीसाठी जीवामृताला प्रोत्साहन

2,841 पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आधुनिकीकरण व फिरती ॲम्ब्युलन्स सेवा

पशुसंवर्धन क्षेत्राचा विकासदर 25% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 366 प्रकल्पांना मंजुरी

या ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ला परळी परिसरातील नागरिक आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top