Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

 Prof. Sanjay Khadse :विचाराला कृतीची जोड दिली तर समाजाला योग्य दिशा मिळते – प्रा. संजय खडसे

 Prof. Sanjay Khadse :सामाजिक जीवनात कार्य करताना केवळ विचार नव्हे, तर त्या विचाराला कृतीची जोड दिली तरच प्रत्येक कार्य यशस्वी होते. समाजातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसह उपेक्षित घटकांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

Prof. Sanjay Khadse

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न: प्रा . संजय खडसे , पत्रकार अशोक इंगळे , पत्रकार डी. एन .पांचाळ यांच्यासह अनेकांना पुरस्कार

साखरखेर्डा  : सामाजिक जीवनात कार्य करताना केवळ विचार नव्हे, तर त्या विचाराला कृतीची जोड दिली तरच प्रत्येक कार्य यशस्वी होते. समाजातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसह उपेक्षित घटकांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, वृक्षमित्र स्व. मधूकर खंडारे यांच्या स्मरणार्थ तसेच दैनिक भारत संग्राम व माजी सैनिक अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त ३० डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्याचा गौरव – रविकांत तुपकर

ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या ओळखून, त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. उपेक्षित घटकांसाठी केलेल्या कार्याचा आज पुरस्काराद्वारे सन्मान होतो, यामागे सेवाभावाची भावना असली पाहिजे. जीवनात इतरांना काहीतरी देण्याची जाणीव ठेवली तरच पुरस्काराचे खरे मोल कळते, असे प्रतिपादन क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी मंत्री यांचे स्वीय सहायक सचिन काटे होते. प्रमुख अतिथी म्हणून रविकांत तुपकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, लोकजागर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रविण गीते, शिवसेना युवा नेते योगेश जाधव, भीमशक्तीचे राज्य नेते कैलास सुखदाने, भाई दिलीप खरात, माजी उपसभापती सुनील जगताप, ठाणेदार गजानन करेवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रियंका काळे, सरपंच अमित जाधव, सय्यद रफीक, शेख रफीक तांबोळी, भीमशक्तीच्या जिल्हाध्यक्षा सौ. आरती इंगळे, अनिकेत सैनिक स्कूलच्या सचिव प्रतिभा गवई, मुख्याध्यापक छाया मनवर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवदास रिंढे, डॉ. माधवराव हिवाळे, जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे, शिवसेना नेते गंभीरराव खरात, माजी सरपंच तोताराम ठोसरे, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव पिसे, प्रा. दिलीप नाईकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण

यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना प्रदान करण्यात आला.१९९० पासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करून समाजातील अडीअडचणींना वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे व माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार
अजाज खान, मारोती वेलभंडारे, वासिक उल्ला खान, शालिग्राम गवई, सोपान वाघमारे, सचिन रामदास खिल्लारे, प्रविण जामदाडे, डॉ. विकास गवई.

आदर्श शिक्षिका पुरस्कार
आशा सुखदाने, सौ. अर्चना साहेबराव भालेराव, क्रांती हेरत, चेतना अहिरे, अस्मिता क्षिरसागर.

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार
मंडळ अधिकारी आनंद राजपूत, प्रकाश शिंदे, प्रकाश सुखदाने.

राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार
सौ. उज्वला काळे यांच्यासह पाच महिलांना.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार
जगन अवचार, साहेबराव भालेराव.

याशिवाय संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज बालगौरव पुरस्कार आदी विविध पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सचिन खंडारे (पत्रकार), माजी सैनिक अर्जुन गवईसेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य संतोष दसरेसेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल सरकटेवैशाली तायडे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top