Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

helping hand :जेव्हा माणसातील ‘देव’ संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देतो 

helping hand : पातूर तालुका आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पेशवेकालीन नानासाहेबांचा राजवाडा, सोन्याच्या गिंन्या नदीवरील प्राचीन मंदिरे असा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्याला ‘पातूर नानासाहेब’ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या या तालुक्यात आजही माणुसकी जिवंत असल्याचे प्रत्ययास आणून देणारे कार्य एक नवखा पत्रकार करीत आहे.

helping hand

पत्रकार किरण कुमार निमकंडे यांचे लोककल्याणकारी सामाजिक कार्य

अकोला : पातूर तालुका आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पेशवेकालीन नानासाहेबांचा राजवाडा, सोन्याच्या गिंन्या नदीवरील प्राचीन मंदिरे असा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्याला ‘पातूर नानासाहेब’ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या या तालुक्यात आजही माणुसकी जिवंत असल्याचे प्रत्ययास आणून देणारे कार्य एक नवखा पत्रकार करीत आहे.

पातूर येथील गुजरी लाईन परिसरात वास्तव्यास असलेले पत्रकार किरण कुमार निमकंडे हे पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरत आहेत. माणूसकी हरवत चालल्याची ओरड होत असताना, प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी जपणारा चेहरा म्हणून किरण निमकंडे यांची ओळख निर्माण झाली आहे.

गत काही काळात शिर्ला परिसरात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन गोधन व आठ शेळ्यांच्या नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली.

वाडेगाव येथे एका हॉटेलजवळ मोटार वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले तसेच नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन सहकार्य केले. तसेच वाशिमहून अकोल्याकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा पितांबरवाडी नजीक अपघात झाल्यानंतर प्राथमिक उपचारांपासून पुढील उपचारांसाठी नातेवाईकांपर्यंत मदतीचा हात दिला.

खानापूर रोड, पातूर येथील सामाजिक वनीकरण विभागातील दोन कर्मचारी बाबुळगावहून पातूरकडे येत असताना बी.एड. कॉलेजजवळ निलगाय रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. त्या वेळी किरण निमकंडे यांनी तात्काळ खाजगी वाहन उपलब्ध करून जखमींना उपचारासाठी मदत केली व संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांना माहिती दिली.

याशिवाय रिसोड येथे लग्नसमारंभासाठी जात असताना मालेगावजवळ समृद्धी महामार्गावरील उड्डाणपुलावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी युवकास पोलीस प्रशासनाच्या मदतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच दोन तरुणी अडचणीत सापडल्याची माहिती मिळताच त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले.

अंबाशी येथील गरीब शेळीपालकाची खरेदी-विक्री व्यवहारात एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची बाब समजताच, संबंधित व्यक्तीस त्याची फसवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी तांदळी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच, त्याला स्वतःच्या वाहनाने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण स्वतःपुरताच मर्यादित राहत असताना, इतरांच्या संकटात निःस्वार्थपणे मदतीला धावून जाणारे पत्रकार किरण कुमार निमकंडे यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल, पातूर नानासाहेब यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष गोपाल गाडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top