Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Deulgaon Raja Municipal Council :देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम : उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी

Deulgaon Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेतील सत्तासमीकरणावर महायुतीने आपली पकड अधिक मजबूत करत मंगळवारी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी महायुतीच्या सौ. वनिता राजेश भुतडा यांनी विजय मिळवला. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी महायुतीकडून गोविंद गजानन तिडके, तर अकोट विकास आघाडी (नगर विकास आघाडी) कडून ॲड. रामभाऊ बाबुराव रामाने यांची निवड जाहीर करण्यात आली.

Deulgaon Raja Municipal Council

स्वीकृत सदस्यपदी रामभाऊ रामाने व गोविंद तिडके

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगर परिषदेतील सत्तासमीकरणावर महायुतीने आपली पकड अधिक मजबूत करत मंगळवारी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी महायुतीच्या सौ. वनिता राजेश भुतडा यांनी विजय मिळवला. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी महायुतीकडून गोविंद गजानन तिडके, तर अकोट विकास आघाडी (नगर विकास आघाडी) कडून ॲड. रामभाऊ बाबुराव रामाने यांची निवड जाहीर करण्यात आली.

पालिका निवडणुकांच्या काळात पश्चिम विदर्भातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या देऊळगाव राजा नगरपालिकेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात दोन बलाढ्य माजी आमदारांच्या पार्श्वभूमीवर नव्या आमदार मनोज कायंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक काही काळ स्थगित झाल्याने प्रचाराचा कालावधी वाढला. या वाढीव कालावधीत अंतर्गत राजकारणातील बंडाळीमुळे काही इच्छुकांना पराभवाचा सामना करावा लागला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा व मित्रपक्ष सहभागी होते. नगराध्यक्षपदी महायुतीच्या माधुरी सिपणे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ९, भाजपाचे ३ असे एकूण १२ नगरसेवक निवडून आले. त्यातच उबाठा गटाच्या २ नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ १४ झाले आणि स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. दुसरीकडे नगर विकास आघाडीचे ७ नगरसेवक विजयी झाले.

आज झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून सौ. वनिता राजेश भुतडा यांना १४ मते मिळाली, तर अकोट विकास आघाडीचे उमेदवार शेख अनवर शेख अली यांना ७ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी महायुतीकडून आलेल्या ७ अर्ज आणि अकोट विकास आघाडीकडून आलेल्या ८ अर्जांना वैधता देण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष माधुरी सिपणे यांनी दोन्ही गटनेत्यांना तौलनिक संख्याबळानुसार नावे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार महायुतीच्या शहर विकास आघाडीकडून गटनेते प्रदीप वाघ यांनी गोविंद गजानन तिडके, तर अकोट विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. रंजना रामाने यांनी ॲड. रामभाऊ बाबुराव रामाने यांचे नाव लेखी स्वरूपात दिले.

महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती) सुधारणा नियम २०१० नुसार दोन्ही उमेदवारांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. सभागृहात २१ नगरसेवक, नगराध्यक्ष माधुरी सिपणे, मुख्याधिकारी अरुण मोकळ तसेच पालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

निवडीनंतर शहरातील विविध भागात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीनंतर नगर परिषदेत महायुतीचे वर्चस्व अधिक भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top