Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

no parking :समृद्धी महामार्गावर ‘नो पार्किंग’चे उल्लंघन; इमर्जन्सी लेनमध्ये उभ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला

no parking : मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील डोणगाव परिसरात इमर्जन्सी लेनमध्ये वाहनांची सर्रास पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेषतः चॅनल क्रमांक २६७ व २६८ दरम्यान गेल्या काही महिन्यांत वारंवार अपघात घडत असून त्यामागे इमर्जन्सी लेनमध्ये उभी राहणारी वाहने हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

no parking

डोणगाव : मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील डोणगाव परिसरात इमर्जन्सी लेनमध्ये वाहनांची सर्रास पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेषतः चॅनल क्रमांक २६७ व २६८ दरम्यान गेल्या काही महिन्यांत वारंवार अपघात घडत असून त्यामागे इमर्जन्सी लेनमध्ये उभी राहणारी वाहने हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

जलद व सुरक्षित प्रवासासाठी उभारलेल्या समृद्धी महामार्गावर मानवी चुका आणि नियमभंगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून इमर्जन्सी लेनमध्ये वाहन उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश असूनही नागपूर व मुंबई या दोन्ही कॉरिडॉरमध्ये संबंधित ठिकाणी वाहनांची बेकायदा पार्किंग होत असल्याचे दिसून येत आहे.

महामार्ग सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसह महामार्ग पोलिसांची यंत्रणा कार्यरत असली तरी इमर्जन्सी लेनमध्ये दररोज मोठ्या संख्येने वाहने उभी राहत असल्याने कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग प्रशासनाने संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सतत देखरेख करावी, तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यासोबतच पेट्रोल पंपाजवळील अधिकृत विश्रांतीस्थळांवरील अनधिकृत वसुली थांबवून वाहनधारकांना तेथेच वाहन उभे करण्यास प्रोत्साहन दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.

एकूणच, समृद्धी महामार्गावरील ‘नो पार्किंग’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि सतत देखरेख आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top