Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Villagers staged a sit-in protest :चरणगावच्या मुख्य रस्त्यावर सांडपाण्यात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Villagers staged a sit-in protest : पातूर तालुक्यातील चरणगाव येथील अंबाशी–चान्नी या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे व साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी (८ जानेवारी) सांडपाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Villagers staged

राहुल सोनोने 

 दिग्रस बू. : पातूर तालुक्यातील चरणगाव येथील अंबाशी–चान्नी या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे व साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी (८ जानेवारी) सांडपाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

या संदर्भात ग्रामस्थांनी २ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देत तातडीने रस्ता दुरुस्ती व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली होती. अन्यथा ८ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

मुख्य रस्त्यावर सांडपाणी साचल्याने मोठे खड्डे पडले असून, याच रस्त्यावरून गावातील व गावाबाहेरील शालेय विद्यार्थ्यांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब गंभीर ठरत आहे.

संतोष इंगळे व अतुल वसतकर यांच्या नेतृत्वाखाली रमेश इंगळे, शुभम इंगळे, शिरसागर, आनंद इंगळे, सुनील इंगळे, अशोकराव देशमुख, अश्विन वाघमारे, गजानन इंगळे, अशोक उपर्वट, ज्ञानेश्वर पुरे, गणेश देशमुख, विशाल इंगळे, विजय इंगळे, अंकुश पगारे, बाबाराव देशमुख, बाबुलाल बंचर, मुरलीधर शिरसागर, माजी सरपंच बाळू वसतकर, राजीव शिरसागर, गंगाधर इंगळे, राजेंद्र इंगळे, श्रीकृष्ण इंगळे गुरुजी यांच्यासह समस्त ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्यावर चक्का जाम करण्यात आला.

दरम्यान, सरपंच मेघाताई प्रमोद देशमुख व ग्रामविकास अधिकारी आगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामपंचायतीकडून आठ दिवसांत सांडपाणी निचरा करून रस्ता सुरळीत करण्यात येईल, तसेच ही समस्या समन्वयाने लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी साचलेल्या सांडपाण्यात बसून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top