Mahabreaking

[breaking_news]

Various programs  : महाशिवरात्रीनिमित्त शिव गोरक्ष धामातील दत्त मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात

Various programs  :  येथील शिव गोरक्ष धामातील दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पालखी प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रांगोळी व फुलांनी रस्ते सजवून पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

Various programs

गजानन भालेकर

धोत्रा नंदाई : येथील शिव गोरक्ष धामातील दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पालखी प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रांगोळी व फुलांनी रस्ते सजवून पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

परमपूज्य हभप संदीप राऊत महाराज यांनी परमार्थ साधनेद्वारे सुख-समाधान प्राप्त होते, असा संदेश भाविकांना दिला. दिवसभर हभप केणे महाराज यांच्या प्रवचनातून उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले. प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत शिवरात्री उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top